Kamgar Home Loan Yojana : महाराष्ट्र सरकार तर्फे घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी 02 लाख ते 06 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे यामध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल तर हे कर्ज तुम्हाला सहज मिळू शकणार आहे, कश्या पद्धतीने कर्जं घ्यावे त्याची काय प्रक्रिया आहे हे सर्व माहिती खाली उपलब्ध आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे हे कर्ज दिले जात असून यासाठी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे, जर तुम्ही बांधकाम कामगार किंवा इतर कामगार असाल तर तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरून सर्वप्रथम नोंदणी करायची आहे.
नोंदणी झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभांमध्ये बसू शकता त्यामध्ये तुम्हाला घर बांधण्यासाठी सहा लाख रुपये कर्जाची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केलेली आहे.
या आर्थिक योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेला PDF मधील फॉर्म भरून तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित विभागात जमा करायचा आहे, जर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली नसेल तर हे कर्ज तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुमची नोंदणी कमीत कमी खर्चात करून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र होऊ शकता.
नियम व अटी
- बांधकाम कामगार हा 18 ते 60 वयाच्या दरम्यान असावा.
- बांधकाम कामगाराने मागील एका वर्षात कमीत कमी 90 दिवस काम केलेलं असावे.
बांधकाम कामगार नोंदणीची प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्जा सोबत जोडायचे कागदपत्रे
- वयाचा दाखला
- 90 दिवस काम केल्याचा दाखला
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र
- तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ
ही नोंदणी तुम्ही फक्त 01 रुपयात करू शकणार असून ही नोंदणी करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर तुम्हाला जायचं आहे वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे जमा करायची आहेत, त्यानंतर तुमची पात्रता तपासून तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करू शकणार आहात.
नोंदणी कशी कराल (MAHABOCW Worker Registration)
- अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला कागदपत्राचा तपशील पाहायचा आहे ती कागदपत्रे तुम्हाला नोंदणी करताना सोबत ठेवायचे आहेत आणि इथे वेगवेगळ्या कामाविषयीच्या तपशील दिलेला आहे त्या कामांमध्ये तुम्ही काम करत आहात का नाही याची खात्री करून नोंदणी करायची आहे.
- त्यानंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी तुमची जन्मतारीख टाकायची आहे. 90 दिवसांपेक्षा जास्त काळ काम केले आहे का तिथे तुम्हाला टिक करायच आहे. तुमच्याकडे निवासाचा पुरावा आहे का तिथे टिक करायचा आहे आणि आधार कार्ड आहे विचारतील तिथंसुद्धा तुम्हाला टिक करायचा आहे.
- या सर्व गोष्टीवर टिक केल्यानंतर तुम्ही पात्रता तुमची तपासू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करताय, परत तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर तुम्हाला इथं नोंदवायचा आहे.
- वरील माहिती टाकल्यानंतर तुमची सविस्तर डिटेल्स त्या फॉर्ममध्ये भरायची आहे, तुमच्याकडे पीएफ नंबर आहे का नाही, किंवा ईमेल आयडी, तुमचे नाव, तुमचा पत्ता ही माहिती त्यामध्ये भरायची आहे आणि तुमचे रजिस्ट्रेशन फक्त 01 रुपयांमध्ये करून घ्यायचे आहे.
हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर या मंडळाच्या विविध योजना आहेत त्या योजनेचा लाभ तुम्ही सहज घेऊ शकणार आहात त्याची माहिती सुद्धा तुम्हाला संकेस्थळावर मिळेल, अशीच वर नमूद केलेली होम लोन ची योजना आहे त्यासाठी सुद्धा फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरून संबंधित विभागास किंवा कार्यालयात तुम्ही हा फॉर्म सादर करायचा आहे.
1 thought on “सरकारची नवीन योजना!! फक्त 01 रुपयांत नोंदणी करून,06 लाख रुपये कर्ज मिळवा | Kamgar Home Loan Yojana”