Indian Bank Education Loan : इंडियन बँकेतर्फे 25 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार; जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Indian Bank Education Loan : इंडियन बँकांतर्गत पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांना तसेच पदव्युत्तर व पदव्युत्तर पदवी याच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो हे कर्ज तब्बल 25 लाखापर्यंत दिले जाते. विद्यार्थ्याने भारतामध्ये अथवा प्रदेशात शिक्षण घेत असावे.

भारतामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक कर्ज इंडियन बँक के अंतर्गत दिल्या जाते इंडियन बँक 1907 साली स्थापन झालेली जुनी राष्ट्रीयकृत बँक आहे. शैक्षणिक कर्जाची ही योजना भारतामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी व भारतामध्ये राहून भारताच्या बाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू असेल या कर्जाची रक्कम ही 25 लाख रुपये आहे.

राष्ट्रीय बँकेकडून हे कर्ज मिळत असल्यामुळे आणि इंडियन बँक हे नावाजलेली बँक आहे भरपूर जुनी बँक आहे, व या बँकेच्या शाखा संपूर्ण भारतभर कार्यरत आहेत त्यामुळे कर्ज घेण्यासाठी जास्त प्रकारची धडपड करण्याची गरज पडत नाही. बँकेने नमूद केलेली सर्व पात्रता तुम्ही धारण करत असेल तर तुम्हाला हे कर्ज सहजरीत्या मिळू शकते.

हे कर्ज तुम्ही कधीही घेऊ शकता यासाठी कोणतीही डेड लाईन बँकेतर्फे दिलेली नाही त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता. हे कर्ज घेण्यासाठी जे पात्रता दिलेली आहे, त्या पात्रताचं पालन करणे आवश्यक आहे. त्या पात्रता खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.

आवश्यक पात्रता

  • अर्जदार हा भारतात किंवा भारताच्या बाहेर पदवीचे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असावा व अर्जदाराची निवड इंटरन्स टेस्ट द्वारे किंवा मेरिट बेसवर झालेली असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने उच्च शिक्षण पूर्ण केलेले असावे ज्यामध्ये दहावी व बारावीचा समावेश असेल.
  • या शैक्षणिक कर्जासाठी अर्जदार हा ग्रॅज्युएशन,पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा डिग्रीचे कोर्सेस भारतात किंवा भारताच्या बाहेर करत असेल तरी अर्ज करू शकतो.
  • एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह एमबीए साठी पात्रता – अर्जदाराने कमीत कमी ग्रॅज्युएट म्हणजे पदवी धारण केलेले असावी किंवा समकक्ष आराध धारण केलेली असावी.
  • अर्जदार हा वर्किंग प्रोफेशनल असावा कमीत कमी तीन वर्ष त्याला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा प्रीमियर किंवा प्राईम प्लस इन्स्टिट्यूट मध्ये एमबीए करत असणे गरजेचे आहे.
  • या योजनेमध्ये प्राईम मिनिस्टर केअर चिल्ड्रन स्कीम अंतर्गत सुद्धा अर्ज करू शकता.

या कर्जाचे फायदे

  • निवड झालेल्या विद्यार्थ्याला चार लाखापासून 25 लाखापर्यंत कर्ज दिले जाते तुम्ही अर्ज करत असाल तर कर्जाची मर्यादा ही 25 लाखापर्यंत आहे.
  • या योजनेअंतर्गत इंडियन बँक चार लाखापर्यंत कोणतीही मार्जिन मध्ये ठेवत नाही, चार लाख ते साडेसात लाखाच्या दरम्यान पाच टक्के मार्जिन मध्ये ठेवते जर तुम्ही भारतात शिक्षण घेत असाल तर व भारताच्या बाहेर शिक्षण घेत असाल तर पंधरा टक्के मार्जिन इंडियन बँकेकडे असत.
  • साडेसात लाखाच्या वर भारतात शिक्षण घेत असेल तर 15% आणि भारताच्या बाहेर 20% एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट प्रोग्राम किंवा एक्झिक्युटिव्ह एमबीए करत असाल आणि 25 लाखाचे कर्ज तुम्ही घेत असाल तर 25% मार्जिन इंडियन बँकेकडे राहते.

कर्जाचा वापर

  • इंडियन बँकेने तुम्हाला हे कर्ज दिल्यानंतर या कर्जाचा वापर तुम्ही कॉलेजच्या ट्युशन फीस, टूरची फीस, इन्शुरन्स प्रीमियम, अकॅडमी किंवा मेंटेनेसचे खर्च, होस्टेल फीस किंवा लॉजिंग बोर्डिंगचे चार्जेस भरू शकता.
  • राहण्याचा खर्च, जाण्या-येण्याचा खर्च तुम्ही या पैशांमधून करू शकता बिल्डिंग फंड, रिफंडेबल डिपॉझिट साठी सुद्धा हे कर्ज तुम्ही वापरू शकता. बुक, युनिफॉर्म, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट, कॅम्पुटर, लॅपटॉप,मेस खर्चासाठी सुद्धा तुम्ही या कर्जाचा वापर करू शकता.

याव्यतिरिक्त इतर पात्रता व आवश्यक बाबी इंडियन बँकेने त्यांच्या साइटवर दिलेल्या आहेत खाली लिंक दिलेली आहे अर्ज करण्या अगोदर त्यावर जाऊन एकदा चेक करून अर्ज सादर करावा.

आवश्यक कागदपत्रे
  1. अर्जदाराचे तीन पासपोर्ट साईज फोटो
  2. बँकेने दिलेल्या नमुन्यात असेट लायबिलिटी स्टेटमेंट
  3. आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालवण्याचा परवाना.
  4. प्रवेश पत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट कॉलेज कडून घेणे आवश्यक असेल.
  5. फी भरल्याचा पुरावा म्हणून शाळेकडून तुम्ही लेटर घेऊ शकता किंवा फी भरण्याची पावती घेऊ शकता.
  6. इतर बँकेकडून कोणते लोन न घेतल्या बाबतचे प्रतिज्ञापत्र.
  7. अलीकडच्या काळातले टेलिफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स पावती.
  8. दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन मार्कशीट
  9. जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  10. उत्पन्नाचा दाखला सरकारी अधिकाऱ्यांना दिलेला
  11. भारताच्या बाहेर शिक्षण घेत असाल तर VISA
  12. पालकांचे किंवा सहकर्जदाराची माहिती
  13. लिक्विड सिक्युरिटी चा पुरावा
  14. उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल.

अर्ज कसा करावा (Indian Bank Education Loan)

  1. या कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता, तुम्हाला इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून https://www.indianbank.in/departments/educational-loan-iba/ या लिंक द्वारे अर्ज सादर करायचा आहे.
  2. इंडियन बँक एज्युकेशन लोन हे पर्याय दिल्यानंतर अप्लाय नऊ या बटनाला क्लिक करायचं आहे. तुम्ही अगोदर इंडियन बँकेचे कस्टमर असाल तर बचत खात्याचा क्रमांक टाकून पुढील प्रक्रिया पार पाडायची आहे.
  3. सविस्तर माहिती तुम्हाला भरायचे आहे ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे व अर्ज सबमिट करायचा आहे.
  4. अर्ज सबमिट झाल्यानंतर इंडियन बँकेकडून तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी कॉल येईल, इंडियन बँकेचे ग्राहक नसाल तर तुम्हाला ग्राहक नाही या पर्यायाला निवडावे लागेल.
  5. दहा अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर ओटीपी येईल, ओटीपी टाकून तुम्ही इंडियन बँकेचे शैक्षणिक कर्जाच्या पेजवर जाल त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज तुम्हाला भरायला लागेल.
  6. सर्व ऑनलाईन माहिती तुम्हाला सादर करावी लागेल व अर्ज सबमिट करावा लागेल त्यानंतर तुम्हाला बँकेकडून कर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी कॉल येईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.इंडियन बँकेमध्ये या शैक्षणिक कर्जासाठी कोण अर्ज करू शकतो?

Ans : हे कर्ज घेण्यासाठी कोणीही अर्ज सादर करू शकतो वरील पात्रता धारण करत असल्यास हे कर्ज तुम्हाला मिळते.

2.या कर्जाचे मर्यादा किती आहे?

Ans : इंडियन बँकेचे कर्ज 4 लाखापासून 25 लाखापर्यंत दिले जाते.

3.हे कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

Ans : हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वर नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करायचा आहे तसेच बँकेचे शाखेला भेट देऊन सुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता.

4.इंडियन बँकेची स्थापना कधी झाली?

Ans : इंडियन बँकेची स्थापना 05 मार्च 1907 रोजी झाली,ही सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे, ही बँक शैक्षणिक कर्जसहित इतर कर्ज व फायनान्शिअल सुविधा सर्वसामान्यांना पुरवते.

Leave a Comment