Federal Bank Scholarship 2024 : फेडरल बँकेकडून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपये आर्थिक साहाय्य;असा करा अर्ज

Federal Bank Scholarship 2024 : फेडरल बँक होर्मोस मेमोरियल फाउंडेशन स्कॉलरशिप 2024-25 हा फेडरल बँके मार्फत हा इनिशिएटिव्ह घेण्यात आला असून ही बँक पदवी च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेली ट्युशन फीज या शिष्यवृत्ती मार्फत परत केली जाते.

ही शिष्यवृत्ती गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब आणि तमिळनाडूमधील विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. तुम्ही जेवढी ट्युशन फीज कॉलेजमध्ये भरणार आहात ती सर्व ट्युशन फीज तुम्हाला या शिष्यवृत्ती मार्फत माघारी दिली जाते.

फेडरल बँक त्यांच्या कार्पोरेट सोशियल रेस्पोंसिबिलिटी अंतर्गत हा कार्यक्रम राबवत आहे यासाठी विविध प्रकारच्या पात्रता, अटी व आवश्यक कागदपत्रे खाली दिलेले आहेत, विद्यार्थ्याने सर्व पात्रता व्यवस्थित रित्या वाचाव्यात आणि कागदपत्राची पूर्तता करत असल्यास लगेच अर्ज सादर करावा.

अर्ज करण्यासाठी पात्रता

  • अर्जदाराने एमबीबीएस बीएससी एग्रीकल्चर, बीएससी ऑपरेशन अँड बँकिंग मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • विद्यार्थी गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब व तमिळनाडू येथील रहिवाशी असावा.
  • विद्यार्थ्यांची निवड रँकिंग बेसवर किंवा सरकारी शाळा कॉलेजमध्ये झालेली असावी.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे.
  • कर्णबधिर मुलांना,अपंग मुलांना तसेच सैनिकांच्या मुलांना या शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • सैनिकांसाठी उत्पनाचा क्रायटेरिया लागू राहणार नाही.
  • तुम्ही अभ्यासक्रमासाठी जेवढी ट्युशन फीस भरलेले आहे, तेवढी ट्युशन फीस तुम्हाला परत मिळणार आहे, त्यासोबतच तुम्ही पीसी लॅपटॉप घेत असाल तर 40 हजार रुपये व टॅबलेट घेत असाल तर 30 हजार रुपये रक्कम तुम्हाला दिली जाते.
  • संपूर्ण रक्कम हे एक लाख रुपये दरवर्षीं फेडरल बँकेकडून शिष्यवृत्ती म्हणून दिली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचा कागदपत्राची आवश्यकता आहे ते कागदपत्र खालील प्रमाणे

  1. अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ
  2. प्रवेश पत्र
  3. कोर्स फीचे स्ट्रक्चर
  4. सरकारी अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
  5. अधिवास प्रमाणपत्र
  6. मागील वर्षी पास झालेल्या परीक्षांचे गुणपत्रक
  7. अर्जदारांचा ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा.
  8. अर्जदार अपंग असल्यास मेडिकल सर्टिफिकेट
  9. युनिव्हर्सिटी कडून सीजीपीए ग्रेड परसेंटेज मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावे.
  10. सैनिकांच्या पाल्यांसाठी वर नमूद केलेले कागदपत्र व सैनिक असल्या बाबतचा पुरावा सोबत जोडावा.
  11. कमी ऐकता येणाऱ्यांना, कमी बोलता येणाऱ्यांना किंवा कमी दिसणाऱ्या विद्यार्थ्याने मेडिकल ऑफिसर यांनी अप्रू केलेले प्रमाणपत्र सोबत जोडायचे आहे/
  12. अर्ज करते वेळेस फोटोग्राफ जेपीजी फॉरमॅटमध्ये असावा व त्याची साईज 500 केबी पेक्षा कमी असावी.
  13. इतर सर्व कागदपत्र हे पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करायचे आहेत व त्याची साईज 300 केबी पेक्षा कमी असावी.

अर्ज कसा करावा (Federal Bank Scholarship 2024)

  • विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे https://www.federalbank.co.in/fedbank-hormis-memorial-foundation या लिंक वर गेल्यानंतर अप्लाय नऊ या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्ही जर नोंदणी केलेले नसेल तर नोंदणी करावी मोबाईल नंबर किंवा ईमेल द्वारे लॉगिन करायचा आहे. नोंदणी केलेले नसल्यास तुम्ही जीमेल, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून नोंदणी करू शकता.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन करावे व व्यवस्थितरित्या लिंक चेक करून अर्ज सादर करावा अर्जामध्ये सविस्तर माहिती भरायचे आहे.
  • यासोबत दिलेल्या साईज मध्ये कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि अर्ज सबमिट करायचा आहे सर्व माहिती व आवश्यक कागदपत्र अपलोड करून हा अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट तुम्हाला भविष्यातील प्रक्रियेसाठी प्रिंट काढून ठेवायची आहे.

निवड प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड त्यांना मिळालेल्या गुणांवर व वैयक्तिक मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती

  • या शिष्यवृत्तीसाठी एक जागा ही अपंग उमेदवारसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे, जर अपंग उमेदवाराचा अर्ज आला नाही तर ती जागा इतर उमेदवार साठी देण्यात येईल.
  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, अर्धवट अर्ज किंवा एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास अर्ज नाकारले जाणार आहेत.
  • शिष्यवृत्ती द्यायची की नाही हे सर्व बँक आणि त्या फाउंडेशन वर अवलंबून राहणार आहे, अर्ज भरला म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेलच याची खात्री नाही.

बँकेचा संपर्क

द फेडरल बँक लिमिटेड, सीएसआर डिपार्टमेंट, चौथा मजला, फेडरल टॉवर्स, मरीन ड्राईव्ह एरणाकुलम. ई-मेल आयडी- सी एस आर ऍड्रेस सेंट्रल बँक डॉट को डॉट इन

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.हे शिष्यवृत्ती कोणा मार्फत दिली जाते?

Ans : ही शिष्यवृत्ती फेडरल बँकेमार्फत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते

2.या शिष्यवृत्ती मार्फत काही कर्ज दिले जाते का?

Ans : या शिष्यवृत्ती मार्फत फक्त ट्युशन फीज परत केल्या जाते.

3.या शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांनी अर्ज कुठे करावा?

Ans : यासाठी विद्यार्थ्याने वर दिलेल्या लिंक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून सुद्धा अर्ज सादर करू शकणार आहेत.

4.अपंग विद्यार्थ्यांना काही वेगळे फायदे आहेत का?

Ans : नाही, सर्व उमेदवारांना एक सारखेच फायदे या शिष्यवृत्ती मध्ये मिळणार आहेत.

Leave a Comment