Colgate Scholarships 2024 : आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येण्यासाठी पैशाची आवश्यकता असते या पैशाची आवश्यकता भागवण्यासाठी आपले घरचे आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात.
परंतु गरीब घराण्यातील किंवा मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांकडे आवश्यक असलेला पैसा मिळत नाही किंवा वेळेवर या पैशाची पूर्तता न करता आल्यामुळे आपला प्रवेश आपल्याला घेता येत नाही शासनाच्या विविध योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येतात परंतु हे अर्थ साहाय्य खूपच कमी प्रमाणात असल्यामुळे विद्यार्थ्यांचा खर्च भागणे जिकरीचे जाते.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागवता भागवत पालकांच्या सुद्धा नाकीनऊ येतात यामध्ये जर तुम्ही डॉक्टरकीचे शिक्षण घेत असाल तर खर्च भरमसाठ येतो, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर किंवा बीडीएस किंवा एमडीएस चे शिक्षण घेत असाल तर कोलगेट पालमोलिव्ह इंडिया लिमिटेड अंतर्गत तुम्हाला 75000 पर्यंत साहाय्य मिळू शकते.
कोलगेट कीप इंडिया स्मायलींग स्कॉलरशिप 2024-25 अंतर्गत कोलगेट इंडिया कडून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 75000 रुपये पर्यंत अर्थसहाय्य दिल्या जाते, हे अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना एक रकमी मिळते आणि एकदाच मिळते, यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागतो.
कोलगेट ही कंपनी 1937 मध्ये स्थापन करण्यात आले कोलगेट हे नाव म्हणलं की आपल्याला टूथपेस्ट, ब्रश याची आठवण येते. यासोबतच कोलगेटचे आणखी वेगवेगळे प्रोडक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मागच्या 80 वर्षापासून कार्यरत असलेल्या कोलगेट ने सामाजिक बांधीलकी जपत ही शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे.
पदव्युत्तर आणि पदवीधर उमेदवारासाठी ही शिष्यवृत्ती असणार आहे दोन्ही विद्यार्थ्यांना एकदाच 75 हजार रुपये एवढे अर्थसहाय कोलगेट मार्फत दिल्या जाणार आहे
शिष्यवृत्तीचे प्रकार (Colgate Scholarships 2024)
खालील दोन वेगवेगळ्या स्कॉलरशिप मार्फत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देते हे अर्थसहाय्य कोलगेट एक तास देता सून हे 75 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य असणार आहे
- कोलगेट कीप इंडिया स्मायलींग स्कॉलरशिप फॉर बीडीएस स्टुडंट्स 2024-25
- कोलगेट कीप इंडिया स्मायलींग स्कॉलरशिप फोर एमडीएस स्टुडंट्स 2024-25
आवश्यक पात्रता
- बीडीएस म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या कोर्समध्ये प्रवेश घेतलेला कोणता विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यासाठी अर्ज करू शकतात.
- या कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावी मध्ये कमीत कमी 65 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- बीडीएस करते वेळेस कोणत्याही एका वर्षामध्ये विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतो.
- दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी या विद्यार्थ्याला कमीत कमी 60 टक्के गुण असावे शेवटच्या सेमिस्टर ला विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकणार आहेत.
- विद्यार्थ्याने नोंदणीकृत सरकारी केव्हा खाजगी विद्यालयातच प्रवेश घेतलेला असावा.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्त्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- ही शिष्यवृत्ती भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे
- बडी फोर स्टडी आणि कोलगेट इंडिया चे कर्मचाऱ्याच्या पाल्याना या शिष्यवृत्ती चा लाभ घेता येणार नाही.
- या शिष्यवृत्ती मध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आंध्रप्रदेश मधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे ते खालीलप्रमाणे.
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखीचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये फॉर्म 16 आहे, उत्पन्नाचा दाखला, बीपीएल सर्टिफिकेट किंवा सॅलरी स्लिप चा समावेश असेल)
- प्रवेशाचा पुरावा यामध्ये कॉलेजचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट देऊ शकता.
- चालू वर्षाची फी भरण्याची पावती.
- विद्यार्थ्याचे बँकेच्या डिटेल्स (कॅन्सल चेक किंवा पासबुक जोडावा)
- मागच्या वर्षीचे मार्कशीट किंवा ग्रेड कार्ड्स जे उपलब्ध असेल ते जोडावे.
- अपंगत्वाचा दाखला जर उमेदवार अपंग असेल तर जोडावा.
अर्ज कसा करावा
- या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून https://www.buddy4study.com/page/colgate-keep-india-smiling-scholarship-program या लिंकवर जाऊन कोलगेट कीप इंडिया स्मायलींग स्कॉलरशिप च्या तेथे उपलब्ध असलेल्या अप्लाय नाऊ (Apply Now) या बटनाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर बडी फोर स्टडी चे अकाउंट लॉगिन करायचे आहे या अगोदर अकाउंट बनवलेले नसल्यास अगोदर नोंदणी करून घ्यावी.
- त्यानंतर कोलगेट कीप इंडिया स्मायलींग स्कॉलरशिप 2024-25 याला क्लिक करायचं आहे अप्लाय नाऊ करून स्टार्ट अप्लिकेशन (Start Application) बटन ला क्लिक करून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- ऑनलाइन पद्धतीने आवश्यक ते सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे ही माहिती भरल्यानंतर विचारले जाणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहेत.
- त्यांनी सांगितलेल्या अटी व शर्तीला (Terms & Conditions) क्लिक करून तुम्ही भरलेला अर्ज प्रीविव् (Preview) या सेक्शनमध्ये व्यवस्थित रित्या तपासायचा आहे, तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती व्यवस्थितरीत्या दिसत असेल आणि अचूक माहिती भरलेली असेल.
- तर त्या स्क्रीनवर दिसणाऱ्या सबमिट (Submit) या बटनाला क्लिक करायचं आहे आणि अर्जाची प्रोसेस पूर्ण करायची आहे.
तुम्ही सुद्धा या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर वर लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन त्वरित अर्ज सादर करावा.
FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) :
1] मी बीडीएस च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे, मी यासाठी अर्ज करू शकतो/शकते का?
Ans : होय. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सध्या बीडीएस अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.
2] या शिष्यवृत्तीसाठी पालकांचे उत्त्पन्न किती असावे लागते?
Ans : शिष्यवृत्तीस पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 8 लाखांपेक्षा कमी असावे.
3] मला हि रक्कम कशी मिळते?
Ans : शिष्यवृत्ती निधी हा केवळ शैक्षणिक-संबंधित खर्च, ट्यूशन फी, वसतिगृह फी, भोजन, इंटरनेट प्रवेश, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, लॅपटॉप, पाठ्यपुस्तके, स्टेशनरी आणि ऑनलाइन शिक्षण सामग्री यासारख्या वस्तूंचा समावेश करण्यासाठी दिला जातो.